Breakfast Menu - Hotel Opal Kolhapur Specialty Kolhapuri Veg and Non veg Cuisine

Go to content

Main menu:

Breakfast menu at Opal

Its an appeasement for us to see you happy. At Opal we offer you a complimentary breakfast with a variety menus to start your day with a gratitude. Along with the menus as per your daily habits, we offer you the most authentic Kolhapuri Misal at Opal.

You will be surely surprised, like the other Kolhapuri famous specialty food at Opal, a Kolhapuri Misal we serve is also famous among our guests.

Breakfast menu is served ulternately with some options available all days.
*Dishes served as per availability.
*Menus for the day are decided as per the number of rooms booked and number of guests.


ओपलला यायचं ते सकाळी नाष्ट्यामध्ये चरचरीत मिसळ आणि कटवडा खाण्यासाठीच. कोल्हापूरच्या चविष्ट परंपरेला साजेसा नाष्टा. अहो काही गोष्टी ज्या त्या जागीच जाऊनच खायच्या. स्थानमहिमा असतो तो.

पटेल तुम्हाला इथं आल्यावर. नुसतं चटण्या आणि मसाले मिसळून पदार्थ चविष्ट बनत नाहीत कधी. त्याला जोड असावी लागते परंपरेची, प्रेमाची आणि आपुलकीची. आपुलकी... जी आम्ही जपत आलोय, गेली पन्नास वर्षे.

सुटलं ना तोंडाला पाणी? करा बघू कोल्हापूरला यायचं आणि ओपल ला रहायचं नक्की.


मिसळीची मेजवानी
कोल्हापूरचं जसं झुणका-खर्डा-भाकरी, तांबडा-पांढरा रस्सा, मटण, चिकन जगप्रसिद्ध; तशीच मिसळ सुद्धा. आणि हो, आपल्या ओपल मध्ये आम्ही हीच अस्सल कोल्हापुरी मिसळ सकाळी नाष्ट्याला देतोय गेली अनेक वर्षे. म्हणजे मिसळीची अस्सल चव चाखण्यासाठी तुम्हाला इतरत्र जाण्याची गरजच नाही.

मिसळ म्हणजे कोल्हापूरच्या चवदार खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य घटक. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण फक्त मिसळीचं जेवण करतात अनेक कोल्हापूरकर. कारण मिसळीसमोर इतर सगळेच पदार्थ चवीला जरा दुय्यमच. पैज लावून मिसळ खाण्याचे खवय्यांचे 'प्रोग्राम' कोल्हापुरात वरचेवर ठरत असतात.

एकदा मिसळ समोर आली की तुम्ही केव्हा मिसळाधिन होता ते तुम्हाला समजत देखील नाही... कारण पहिल्या घासालाच 'ती' तुमचं मन जिंकते.  मिसळीचा कट आणि पातळ भाजी ही दोन संपूर्णतः वेगळी वैशिष्ट्य तुम्हाला फक्त इथंच पहायला अन चाखायला मिळतील. नुसतंच पुढ्यात आलं आणि खाऊन झालं, हे मिसळीच्या बाबतीत होत नाही; होऊ नये.

आम्ही पण काय नुसत्याच गप्पा मारतोय मिसळीबद्दल? जशी तुम्हाला आवड चवीनं खाण्याची, तशीच आम्हाला भर-भरून देण्याची. या बघू एकदा ओपल ला रहायला, मस्त कोल्हापुरी मिसळ खायला, अस्सल गावरान चव चाखायला.

खरंतर तुम्ही तर जातीवंत पर्यटक. सतत देशाटन करणारे. कोकणात मासळीची आणि कोल्हापुरात मिसळीची महती तुम्हाला सांगायला हो कशाला पाहिजे?

कोल्हापुरी कटवडा
कोल्हापुरी कटवड्याचा नाद करायचा नाही. हा खरंतर आपल्या आवडत्या कोल्हापुरी मिसळीचा सख्खा भाऊ. पण जरा दुर्लक्षित राहिलेला. त्यामुळं कटवड्याची खासियत, चव, चरचरीतपणा याबद्दल जास्ती काही लिहीत नाही आता इथे. ते सगळं मिसळीप्रमाणेच आहे.
 
Copyright 2016. All rights reserved.
Back to content | Back to main menu