Renovated AC dinning hall of Hotel Opal

Restaurant timing
Morning 12.00 noon till 4.00 pm
Evening 7.30 pm till 11.00 pm
Reservations & bookings
+91 231 2536767, 2536969, 2537044
+91 9881146767, 8975212100
Go to content

Renovated AC dinning hall of Hotel Opal

Hotel Opal Kolhapur Specialty Kolhapuri Cuisine Tambada Pandhra Rassa
Friday 10 Jan 2020
बदल हा खरंतर सृष्टीचा नियम आहे. या नियमाला अनुसरूनच 'ओपल'ने अनेक सकारात्मक बदल स्वीकारले. वर्षानुवर्ष असलेले डायनिंग हॉलचे परंपरागत स्वरूप बदलून त्याचे रूपांतर एसी डायनिंग हॉलमध्ये केले आणि आणि या बदलाचे ग्राहक, हितचिंतक आणि कोल्हापूरला भेट देणाऱ्या पर्यटकांकडून स्वागतही झाले. एवढा मोठा, प्रशस्त, स्वच्छ आणि नीटनेटका अस्सल-कोल्हापूरी शाकाहारी आणि मांसाहारी मेन्यू मिळणारा डायनिंग हॉल कोल्हापुरात बहुदा हा एकमेवच आहे.
'ओपल'च्या लज्जतदार मेन्यू बद्दल अनेकदा विविध माध्यमांतून लिहिलं आणि प्रदर्शित केलं गेलं आहे. परंपरागत खाद्यपदार्थांचा "टाईम्स नाऊ फुडी अॅवॉर्ड २०१२" देखील 'ओपल'ला मिळालं आहे.
या अनेक वैशिष्ट्यांसह सज्ज असलेला आणि गेली 51 वर्षे ग्राहकांना सेवा देणारा 'ओपल'चा डायनिंग हॉल आज आणखी एका कारणामुळे नावारूपास येतो आहे. ते म्हणजे इथं उपलब्ध असलेलं दोन मजली कार पार्किंग. 50 ते 60 कार आरामात पार्क होणारं अशा पद्धतीचं दुसरं ठिकाण निदान दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात तरी सापडणार नाही.
कालानुरूप आवश्यक असलेले बदल स्वीकारत आणि घडवत ओपलनं कोल्हापूरच्या पर्यटन व्यवसायामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे.
आज पहा नुकतीच नूतनीकरण करण्यात आलेल्या 'ओपल'च्या डायनिंग हॉलची काही छायाचित्रे.
For more information and updates, please visit www.hotelopal.co.in
#kolhapuricuisine
#muttonkolhapuri
#tambda_pandhra
#muttonsukka
#hotelopalkolhapur
#opalkolhapur
#kolhapurtourism


Back to content